top of page

संपन्न झालेले कार्यक्रम

शिक्षक व पालक ह्यांचे हार्दिक अभिनंदन !!

२०२० शालांत परीक्षेचा निकाल ९७.४३ %. सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक ह्यांचे हार्दिक अभिनंदन !!

७४ वा स्वतंत्रता दिन १५ ऑगस्ट २०२०

७४ वा स्वतंत्रता दिन १५ ऑगस्ट २०२०

   

सकाळी ठीक ८ वाजता सन्मित्र मंडळ विद्यामंदिर गोरेगाव येथे ' भारतीय स्वातंत्र्यदिन समारंभाचे' आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या कोरोना महामारीच्या संकट काळातही शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. सर्व विद्यार्थी व पालक यांना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहता यावा व घरूनच सुरक्षित राहून सहभागी होता यावे यासाठी गुगल मीट लिंक पाठवण्यात आली होती.

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जोशी सर, पदाधिकारी मा. श्री. नारायण सामंत, तीनही विभागाचे मुख्याध्यापक अनुक्रमे मा. श्री. गव्हाळे (माध्यमिक विभाग), मा. सौ. सावंत (प्राथमिक विभाग),सौ. भावे(पूर्व प्राथमिक), पर्यवेक्षक सौ. मोरे, जेष्ठ शिक्षक श्री गोरे ,शिक्षक सौ मिताली ताई, सौ प्राची ताई, शिक्षकेतर कर्मचारी श्री मोहीते, श्रीम चंद्रात्रे, शिपाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

सुरूवातीला संस्थेच्या प्रथेप्रमाणे सप्टेंबर २०२० रोजी सेवानिवृत्त होणारे शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री गोरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंडागीत व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. श्री निशाणकर सरांनी स्वातंत्र्यदिनाच्या घोषणा दिल्या व सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जोशी सर यांनी सर्वांना भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व देशावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होवो अशी प्रार्थना केली.
 

या कार्यक्रमात गुगल मीट द्वारे पालक व विद्यार्थी यांनी घरी राहून मानवंदना दिली.दरवर्षी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते तरीही या वर्षी विद्यार्थी विविध उपक्रम उदा देशभक्तीपर गीते, वीरगीत, वीरकथा, रांगोळी, बासरीवादक, भाषण, घरीच सादर करून स्वातंत्र्यदिनाच्या सोहळा संपन्न केला.

टीप:- १५ ऑगस्ट २०२० निमित्ताने विद्यार्थी व पालकांनी आपापल्या घरी तयार करून पाठवलेली व्हिडिओ आपल्या फेसबुक पृष्ठ वर

पहा>>>https://www.facebook.com/sanmitramg/videos/302467597752238/
 

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page