नोंदणी क्र. E-1817(Bom.)
३१ ऑगस्ट २०१८ शिक्षकांसाठी संगणक प्रशिक्षण वर्ग
शिक्षकांच्या दैनंदिन कामातील संगणकाची अपरिहार्यता लक्षात घेऊन आज 31 ऑगस्ट रोजी संस्थेचे खजिनदार, संगणक तज्ज्ञ व कन्सल्टंट श्री. अजित वर्तक ह्यांनी शिक्षकांसाठी आज संगणक प्रशिक्षण वर्ग घेतला. ह्या वर्गात खालील विषय मांडले.
संगणकाची मूलभूत माहिती ( हार्डवेअर,सॉफ्टवेअर, इनपुट/आउटपुट डिव्हाईस/ऑपरेटिंग सिस्टिम, व्हायरस, ड्राईव्ह)
डेटा ऑर्गनाईज असावा ह्या दृष्टीने फाईल/फोल्डर स्ट्रक्चर/ शॉर्ट कट
दैनंदिन कामात संगणकातील प्रोग्रॅमचा अधिक प्रभावी वापर कसा करावा, डेटा कलेक्शन आणि ऑर्गनायजेशन एक्सेल लिस्ट, कॉलम, टेबलडेटा प्रोसेसिंग - फिल्टर, सॉर्टिंग,टेक्स्ट टू कॉलम
डेटा अॅनेलिसिस आणि रिपोर्टिंगसाठी पिव्होट टेबल आणि चार्ट, शालेय कार्यक्रमाचे वृत्तकथन प्रभावी पणे करण्यासाठी छायाचित्र व वर्ड प्रोग्रॅमचा वापर, देवनागरीतील लिखाणासाठी युनिकोडचा वापर, त्याचे पी डी इफ मध्ये रूपांतर करणे.
मोबाईल अॅप्लिकेशनचे इंटीग्रेशन - व्हॉट्स ऍप वेब चा वापर
शेवटची 15 मिनिटे प्रश्नोत्तरे अशी एकूण दोन तास कार्यशाळा संपन्न झाली.