


नोंदणी क्र. E-1817(Bom.)
१७ मार्च- बाल विकास प्रदर्शन
बाल विकास प्रदर्शन - १७ मार्च
संस्थेच्या " हीरक महोत्सवी वर्षानिमित्त " संस्थेच्या पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक विभागाच्यातर्फे संपूर्ण वर्षभरात विविद शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले. संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा करण्यासाठी रविवार दि 17 मार्च 2019 रोजी संस्थेच्या पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वतीने " बालविकास साहित्य प्रदर्शनाचे" आयोजन करण्यात आले,ज्यामध्ये पूर्व प्राथमिक स्तरातील छोटा शिशु वर्ग, मोठा शिशु वर्ग. प्राथमिक स्तरातील इ.1ली ते 4 थी,माध्यमिक स्तरातील इ.5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन करण्यासाठी शिक्षक जी विविध शैक्षणिक साधने वापरतात त्यांचा मांडणी करण्यात आली होती. रविवार दि.17 मार्च 2019रोजी सकाळी ठीक 9: 00 वाजता कार्यक्रमच्या प्रमुख अतिथी कुमारी आर.पद्मश्री कृष्णमूर्ती राव यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर कु.राव यांनी शांतपणे संपूर्ण प्रदर्शन पहिले .
कु.राव यांनी प्रदर्शन पाहतांना विविध शैक्षणिक साधनांची माहिती सांगणारया विध्यर्थ्यांना, शिक्षकांना विविध प्रश्न विचारुन शैक्षणिक साधनांची उपयुक्तता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सकाळी ठीक 10:30 वाजता " बालविकास साहित्य प्रदर्शनानिमित्त " आयोजित खास अश्या सभेची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व निमंत्रित , मान्यवर , संस्थेचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.सन्मित्र्च्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुश्राव्य स्वरात स्वागतगीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले.पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक मा.सौ.नंदिनी भावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ज्यामधे त्यांनी शाळेत चालणारया विविध उपक्रमां चा आढावा घेतला तर मा.प्रमुख अतिथींचा परिचय प्राथमिक विभागाच्या मा.मुख्याध्यापिका सौ. सावंतबाई यांनी करुन दिला. सन्मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री जयंतराव विद्वांस कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थीत होते.त्यांनी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्रमुख अतिथी कु.आर पद्मश्री कृष्णमूर्ती राव यांनी आपल्या भाषणात प्रथमतः सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून सुंदर प्रदर्शन भरविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची का आवश्यकता आहे याचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर आपण आपल्या मराठी शाळा,मराठी भाषा,मराठी संस्कृती जर टिकवू शकलो नाही तर त्याचे आपल्या जीवनावर किती वाईट परिणाम होऊ शकतील याचा अंदाज घेतला.मातृभाषेचे महत्त्व विशद करतांना त्यांनी अनेक पाश्चिमात्य भाषातज्ञ,इतिहासकार यानी मातृभाषे संबंधी जे विचार मांडले त्याचे दाखले दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.गावडेबाई यांनी केले तर कार्यक्रमाच्या अखेरीस माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा.सिद्धार्थ गव्हाळे यांनी " बालविकास साहित्य प्रदर्शनाच्या " उदघाटक व प्रमुख अतिथी मा.कु.आर.पद्मश्री राव यांचे मन:पूर्वक आभार मानले व त्या स्वत: अमराठी असून देखील त्या मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्या आपल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांतून प्रयत्न करीत आहेत त्यबद्दल त्यांचे कौतुक केले त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर मा मुख्याध्यापक सिद्धार्थ गव्हाळे यांनी कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थीत राहिलेले विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक, शाळेचे,संस्थेचे हीतचिंतक यांचे मन:पूर्वक आभार मानले व " बालविकास साहित्य प्रदर्शन " यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या तीनही विभागातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर,विद्यार्थी ,पालकवर्ग यांचे कौतुक केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.
दुपारच्या सत्रात " सन्मित्र मंडळ,गोरेगाव - संस्थेचे अध्यक्ष मा.विजय जोशी,संयुक्त कार्यवाह मा.प्रशांत आठले, मा.ननिवडेकर,खजिनदार मा.अजित वर्तक व इतर मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली व शिक्षकांचे कौतुक केले. दुपारनंतर विविध संस्थांचे प्रतिनिधी,पालक,शिक्षक,संस्थेचे ,शाळेचे हीतचिंतक यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.संध्याकाळ पर्यंत शिक्षण क्षेत्राशी संबंधित जवळजवळ 300 मान्यवरांनी व इतर 600 व्यक्तींनी प्रदर्शनाला भेट दिली उपक्रमाचे कौतुक केले.प्रदर्शनाला भेट देणारया विशेष मन्यवरांमध्ये " मराठी शाळा वाचवा फेसबुक ग्रुप " चे संस्थापक मा श्री प्रमोद गोखले व " समर्थ भरत गर्भ संस्कार केंद्राचे डॉ अभय शाह यांचा समावेश होता.सायंकाळी सहा नंतर पालक ,विद्यार्थी यांचा प्रदर्शन पाहण्यासाठी ओघ वाढला पण वेळचे बंधन लक्षात घेऊन सायंकाळी प्रदर्शनाची सांगता झाली. शिक्षक,संस्थाचालक,पालक,हीतचिंतक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीती मुळे संस्थेचा हा उपक्रम अविस्मरणीय ठरला.