नोंदणी क्र. E-1817(Bom.)
संपन्न झालेले कार्यक्रम
३१ जुलै २०१९-नूतन शिशु मंदिर दिप अमावस्या कार्यक्रम छान संपण झाला.
३१ जुलै २०१९-दिप अमावस्या. नूतन शिशु मंदिराच्या भावेबाईनी निरनिराळ्या प्रकारचे दिवे गोळा करून ती साजरी केली. मुलाना दिव्या मधील प्रगतीची छान माहिती सांगितली. मशाल कंदिल चिमणी लामणदिवा असे विविध प्रकारचे दिवे गोळा करून मुलांना प्रत्यक्षात दाखवून त्या दिव्यांच्या पासून ते बल्ब ट्युबलाईट पर्यंत प्रवास सांगितला.कार्यक्रम छान झाला. सर्वांना प्रसाद देऊन कार्यक्रम संपला.
प्राथमिक विभागाने अशाच प्रकारे दिप प्रदर्शनी लावली होती.
२० जुलै २०१९-रोजी इ१०वी मार्च २०१९च्या यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा
२० जुलै २०१९-रोजी - इ१०वी मार्च २०१९च्या यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शालेय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शाळेचे माजी विद्यार्थी मा.श्री. माधव सावंत प्रमुख अतिथी होते. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जोशी सर, इतर सन्माननीय पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. गव्हाळे सर,पूर्व प्राथ.च्या प्राचार्या मा सौ. भावे बाई, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, हितचिंतक या सर्वांच्या उपस्थिततीत हा सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संयुक्त कार्यवाह मा. श्री. आठल्ये सरांनी केले. आपल्या प्रास्ताविकेत त्यांनी शाळेच्या प्रगतीचा उंचावलेला आलेख सर्वांसमोर मांडताना आपल्या संस्थेत ठळक दिसणारी गुणवत्ता हे विशिष्ट नियोजन आणि सर्वांच्या प्रयत्नांतून मिळालेले यश आहे.
संस्थेचे संयुक्त कार्यवाह मा. श्री. नानिवडेकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना श्री सावंत हे शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदक मिळवलेले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते कौतुकपात्र विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक मा श्री.गव्हाळे सरांनी यावर्षी निकालाच्या वाढलेल्या टक्केवारी बद्दल समाधान व्यक्त केले. वर्षभर मेहनतीबरोबर नियोजन, जिद्द, सराव खूप महत्त्वचे आहे. असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राथ. विभागाच्या सौ. भावे व पूर्व प्राथ. च्या जेष्ठ शिक्षिका सौ. सुचिन्ना यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी मा श्री. माधव सावंत यांनी आपल्या भाषणात त्यांचे विज्ञान शिक्षक श्री. जोशी यांनी दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आपण प्रगती करून शाळेचे नाव उज्ज्वल करू शकलो. भविष्यात फक्त इंजिनीअर, डॉक्टर याच क्षेत्राकडे न वळता आपल्या आवडीचे क्षेत्र निवडल्यास यशस्वी होता येते. असे मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात जोशी सरांनी श्री. माधव सावंत यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कोणतेही क्षेत्र निवडा पण मन लावून काम करा. शाळेला अभिमान वाटेल असे कार्य करा असा मोलाचा संदेश दिला. संस्थेच्या सदस्या मा. सौ. अरुणा सप्रे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. पगारे बाई यांनी ओघवत्या शैलीत उत्तमप्रकारे केले. परसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
१२ जुलै २०१९- नूतन शिशु मंदिर -आषाढी एकादशी - एक आगळा वेगळा उपक्रम.
सन्मित्र मंडळ - नूतन शिशु मंदिर
आषाढी एकादशी - एक आगळा वेगळा उपक्रम
एक एक झाड लावू ममतेनं|
आम्ही फुलवू हे रान सार हिमतीनं||
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल............||
विठ्ठलाच्या गजरा बरोबरच निसर्ग रक्षणाचा गजर करण्याची वेळ आली आहे. आपलं काही वाईट झालं की आपण देवाला, नशीबाला दोष देतो पण जेंव्हा दुसरीकडे बोट दाखवताना आपल्याकडे आपलीच चार बोटं आहेत ह्याचा विचार आपण करतच नाही. निसर्ग ही एक शक्ती आहे त्याला जसे आपण हाताळू तसे त्याचे रूप आपल्याला तो दाखवतो. हे जाणून समाजात निसर्गरक्षणाची जाणीव व्हावी त्याचे महत्व समजापर्यंत पोहचावे. निसर्गरक्षणाचा संस्कार या वयातच व्हावा म्हणून दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला निघणाऱ्या दिंडी बरोबर वृक्षदिंडीचंही आयोजन यावर्षी केलं होत. ती आपल्या शाळेभोवतीच न फिरवता या वर्षी ती आरेकॉलनी आदर्शनगर पर्यंत नेली.
आठवडाभर आधीच शाळेत दिंडीचे वारे वाहुलागले होते. गजर, भजन, भारुड, जयजयकार याचा सराव रोज मुलांकडून करून घेतला जात होता. वृक्ष, वनस्पती त्यांची उत्पत्ती, निगा त्यांचा उपयोग मुलांना त्यांच्या भाषेत गप्पांच्या, चित्रांच्या, प्रोजेकटरच्या मार्फत सांगितला जात होता.
आदल्या दिवशी मुलांनकडून दिंडी सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कापडी फुलांचे, मण्यांचे हार करून घेतले. त्यात अरुण वर्गाने लाकडी मणी ओवले, उदय वर्गाने पान- फुल- पान ओवले आणि प्रभात वर्गाने सोनेरी मणी- मोठा मणी- छोटं फुलं असे हार करून घेतले होते.
मुलांना पालकांनसह सकाळी ठीक ९.०० वाजता शाळेत बोलावलं होत. आल्यावर विठ्ठलाची, पालखीची पूजा करून दिंडीचे गोरेगाव बसस्थानकाकडे प्रस्थान झाले. तिथे आपल्याच शाळेतील पालक श्री थोरात यांच्या सहकार्याने BEST दिंडोशी डेपोच्या मा. श्री वालावलकर साहेबांनी आपल्याला बस उपलब्ध करून दिली होती. BEST इंस्पेक्टर श्री नाईक आमची वाटच पहात होते. बस स्थानकात गेल्या गेल्या सगळे पालक एका रांगेत मुलांना घेऊन बस मध्ये चढले. स्वखर्चाने सगळे पालक, विदयार्थी, शिक्षक झांजा, खंजिरी वाजवत माऊलीचा गजर करत आदर्शनगरला पोहचलो. तिथेही आरेकॉनीतील सगळे पालक मावशी दिंडीच्या स्वागतासाठी सज्ज होते. स्वच्छ परिसर, रांगोळ्या, फुलांनी वातावरण भारून गेले होते.
भुरकुड, खेडकर व पालांडे आजोबा या पालकांनी स्वता:हून तिथल्या व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली होती.
तिथे गेल्यावर साईमंदिरात दर्शन घेऊन मंदिरातील सभागृहात विद्यार्थी पालक यांना बसवण्यात आले. वंदना झाल्यावर ताईंनी एकादशीची गोष्ट सांगून उपवासाचे, दिंडीचे महत्व मुलांना सांगताना पोटातल्या मिक्सरला म्हणजेच जठराला विश्रांती मिळावी म्हणून उपवास करायचा असतो असे सांगून आध्यात्मिक माहीती बरोबर त्याच्या पाठीमागचं शास्त्रही मुलांना पालकांना पटवून दिलं. नंतर सगळ्यांनी भुरकुड यांनी दिलेल्या चहाचा आस्वाद घेतला.
मंदिराच्या प्रांगणात फेर धरून, फुगड्या घालून मुलांनी पुन्हा एकदा गजर, भजन, भारुड, माऊलीचा जयजयकार करत दिंडीचा आनंद घेतला. प्रसाद म्हणून राजगिरा लाडू खाऊन आम्ही निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पुढे निघालो. मुलांच्याहस्ते वृक्षारोपण झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, वेली, झुडपं यांचा परिचय करून दिल्यावर मुलांना प्रत्यक्ष शेती, झरा वेगवेगळी झाडं आज पहायला मिळाली. तिथले वातावरण वेगवेगळा गंध, स्पर्श, दृश्य निसर्गाच्या किमयेची जाणीव करून देत होता. एका मिनिटात मुंबई सारख्या गजबजाटातून मुक्त झाल्याची भावना मनाला वेगळीच उभारी देऊन गेली. प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर आपल्या पाल्याबरोबर नवीन काही आत्मसात करतानाचे भाव दिसत होते. कोणी तोंडल्याच्या मांडवाला लगडलेली तोंडली, लिंबाच्या झाडावरची हिरवी लिंब, वेगवेगळी फुलझाडं, भाज्या, शेती,झऱ्यातले बारीक खेकडे न्याहळत मुलांन बरोबर स्वतःही आनंद उपभोगताना दिसत होते. वेगवेगळ्या पद्धतीने निसर्ग आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेतल्यावर सगळे परत आपापल्या घरी जाण्यास निघाले.
अशी आगळी वेगळी आषाढी एकादशी सन्मित्र शाळेच्या नूतन शिशूच्या मुलांनी अनुभवली.
मंदिरातल्या गुरुजींना धन्यवाद देण्यासाठी गेल्यावर त्यांना व इतर व्यक्तींना आपला उपक्रम खूप आवडला म्हणून दरवर्षी इथेच येण्यासाठी इच्छा व्यक्त केली. रस्त्यातही खूप जणांनी आपल्या दिंडीचे, मुलांचे व्हिडीओ, फोटो काढत कौतुक केले. माऊलिंच्या गजरात मिनिटभर का होईना आनंद घेत माऊलीचा जयजयकार करत सहभागी होत होते.
१२ जुलै २०१९-आषाढी एकादशी निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आषाढी एकादशी निमित्त सन्मित्र मंडळ विद्यामंदिर गोरेगाव येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभंग ऐकतच विद्यार्थी शाळेत प्रवेश करत होते. वातावरण प्रसन्न झाले होते. विठ्ठल मूर्ती तुळशीच्या माळा घालून सजवलेल्या मंदिरात ठेवण्यात आली. सकाळ अधिवेशनात सौ गावडे व दुपारी श्री गावडे व सौ धस बाई यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. मुख्याध्यापक मा श्री गव्हाळे सर यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीचे पूजन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, विठ्ठलाचे गळयात तुळशीहार घातलेले रुप, व विठ्ठलाला पाहून देहभान हरपून गेलेले वारकरी, भक्ती व समतेचा अभूतपूर्व संगम असलेली पंढरपूर वारी हे सांगताच भक्ती व श्रद्धेचा प्रत्यय आला. विद्यार्थ्यांनी सुमधुर अभंग गाऊन सर्वजण भक्तिरसात न्हाऊन गेले. कार्यक्रमाच्या शेवटी 'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल.. " या गजराने विठ्ठलाच्या भक्तिरसात सन्मित्र विद्यामंदिर अखंड न्हाऊन गेले. कार्यक्रमातील काही क्षणचित्रे ...
१२ जुलै २०१९-आज आषाढी एकादशी निमित्त प्राथमिक विभागातर्फे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
आज आषाढी एकादशी निमित्त प्राथमिक विभागातर्फे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .विद्यार्थी वारकरी पेहरावात नटून शाळेत आले होते.पालखी सजविण्यात आली.शाळेतील विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन केले गेल.विद्यार्थ्यांनी त्यांना शिकविलेल्या गीताचे गायन केले.टाळ्या आणि टाळांच्या गजरात आरत्या म्हटल्या.शेवटी मंत्र पुष्पांजली म्हटली .विठ्ठल नामाचा जयघोष करीत शाळेतून दिंडी निघाली.विठ्ठल नामाच्या गजराने आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला.पुन्हा दिंडी शाळेत आणल्यावर खऱ्या शेंगदाण्याचा प्रसाद देण्यात आला.दिंडी सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेने आयोजित केलेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेचा आनंद घेतला.माधव सभागृहात सदर स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग वाचवा या विषयावर एकपात्री अभिनयाचे सादरीकरण छान आत्मविश्वासाने केले .अशा प्रकारे आपली संस्कृती जतन करण्याचा संस्कार या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने केला गेला .
६ जुलै २०१९-महाराष्ट्र ज्ञानपीठ आयोजित परीक्षा.
नमस्कार !
६ जुलै २०१९-महाराष्ट्र ज्ञानपीठ आयोजित चित्रकला, सामान्यज्ञान,गणित,इंग्रजी या परीक्षांमध्ये आपल्या बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात .शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील महाराष्ट्र ज्ञान पीठ आयोजित इंग्रजी परीक्षेत इयत्ता चौथीमधील कुमार शिवराज अजित वर्तक हा विद्यार्थी 100 पैकी 100 गुण मिळवून मेरिट लिस्ट मध्ये प्रथम आला आहे .त्याबद्दल त्याचे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम.वैशाली सावंत यांनी अभिनंदन केले व त्याच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या .