


नोंदणी क्र. E-1817(Bom.)
१८ फेब्रुवारी - विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत सन्मित्रच्या विद्यार्थ्यांचे यश
1. विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत सन्मित्रच्या विद्यार्थ्यांचे यश
विद्यार्थी विज्ञान मंथन ही विज्ञान भरती, विग्यान प्रसार ( विज्ञान आणि प्रऔद्योगिक विभाग, भारत सरकार) व एन.सि.इ.आर.टी (मनुष्य बळ विकास मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा असून पूर्णपणे डिजिटल साधने( स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब इ.) वापरून विद्यार्थी परीक्षा देतात.
मूलभूत विज्ञानाची रुची विद्यार्थ्यांनमध्ये निर्माण करणे हे या परीक्षेचे उद्दिष्ट आहे. या वर्षी संपूर्ण देशातील ६२३० शाळांतील 144839 विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या प्राथमिक फेरीची परीक्षा दिली.
सन्मित्रच्या इ.६वी ते ९ वितील एकूण १५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा स्मार्टफोन वापरून दिली. आपापल्या इयत्तेच्या अभ्यासा व्यतिरिक्त मुलांनी 'भारताचे विज्ञाना प्रती योगदान', तसेच डॉ. मेघनाद साहा व श्रीनिवास रामनुजम या दोन शात्रज्ञांची माहिती अभ्यासली.
शालेय स्तरावर कु. अनिरुद्ध विजय गोंडाल, कु.शिवम देवेंद्र गोहिल, कु.तुषार अनिल निवाते व कु. मयुरेश जयवंत शहासने (सर्व इ. ६वी) यांनी अनुक्रमे १ला,२रा,व ३रा क्रमांक विभागून पटकावला.
इ. ७ वीतील कु. रुद्र राजन जोशी याने मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील ७वीच्या सर्व विद्यार्थ्यांमधून तृतीय क्रमांक पटकावला .
तसेच कु.लावण्या अजय तळवडेकर ही विद्यार्थिनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ९ वीच्या एकूण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. मोरेबाई व सौ. कदम बाई यांनी मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
2. आंतरशालेय नेहरू विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सन्मित्र शाळेचा द्वितीय क्रमांक.
दरवर्षी मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या आंतर शालेय विज्ञान प्रशमंजुषा स्पर्धेत या वर्षी सन्मित्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमांक पटकावला.
प्राथमिक लेखी परीक्षेत मुंबई व ठाणे शहर विभागातील एकूण १३० शाळांनी भाग घेतला होता. मौखिक प्रश्नांच्या विविध टप्प्यांवरील स्पर्धांमधून महात्मा गांधी विद्यालय बांद्रा, बालमोहन विद्यालय दादर, सन्मित्र विद्यालय गोरेगाव व सरस्वती विद्यालय ठाणे या चार शाळा अंतिम फेरीत पोहोचल्या.
कु. अस्मिता अरविंद सुतार, कु. अथर्व ललित चुरी (इ.१० वी ब) ,कु.यशस्वी यशवंत खैरे(इ.९ वी ब) व कु.अनुजा प्रशांत सोमण (इ. ८वी ब) या विद्यार्थ्यांनी शाळेचे प्रतिनिधित्व करून शाळेला द्वितीय क्रमांक मिळवून दिला.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या विज्ञान शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या आधी सलग तीन वर्षे आपल्या शाळेनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन.
१६ फेब्रुवारी -२०१९ इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय सभागृहामध्ये " सदिच्छा समारंभाचे"
शनिवार दि.16 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता इयत्ता 10 वी ( एस.एस.सी. 2018 - 19 ) च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय सभागृहामध्ये " सदिच्छा समारंभाचे" आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सं.कार्यवाह मा.श्री.प्रशांत आठले,मा.श्री. प्रकाश ननिवडेकर,संस्थेचे खजिनदार मा.श्री.अजित वर्तक व संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अरुणा सप्रे त्याचबरोबर सन्मित्र मंडळ विद्यामंदिर चे मा.मुख्याध्यापक मा.सिद्धार्थ गव्हाळे,संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुक्रमे सौ सावंतबाई व सौ भावेबाई तसेच संस्थेच्या तीनही विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली गेली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा. गव्हाळे सरांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात विद्यार्थ्यांना जीवनामध्ये उत्तमोत्तम यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी चिकाटी,सचोटी,प्रामाणिकपणा , संयम व ध्येय निश्चिती हे गुण अंगिकारले पाहिजेत असे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील गत अनुभवांना उजाळा दिला. काही विद्यार्थिनींनी आपल्या भावना स्वरचित कवितांमधून व्यक्त केल्या. काही शिक्षकांविषयी व विद्यार्थ्यांच्या संवेदनेविषयी सांगितलेल्या घटना डोळे पाणवणाऱ्या होत्या.
सीताराम दादानी सुधीर फडके ह्याचे गीत गाऊन विद्यार्थ्यना संदेश दिला.
सौ. पगारे बाईंनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भावी जीवनातील वाटचालीसाठी प्रतिज्ञा दिली
तीनही विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या व आपल्या ह्या हीरक महोत्सवी वर्षीचा निकालही 100% लागेल असा विश्वास व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी शाळेला व संस्थेला उपयुक्त सतरंज्या भेट दिल्या. मंदारने वैयक्तिक पातळीवर शाळेच्या पुढील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ढोलकी भेट दिली. 10 ब च्या विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून वर्गशिक्षकांना त्यांच्या सोबत काढलेल्या फोटो ची फ्रेम दिली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सॅक व पाऊच अश्या उपयुक्त वस्तुंची भेट दिली.
संस्थेचे खजिनदार मा. श्री अजित वर्तक यांनी परीक्षा जवळ आली असता आपण शिल्लक राहिलेल्या वेळचे उत्तम नियोजन करून चांगल्या प्रकारे यश कशाप्रकारे मिळवू शकतो याविषयी कानमंत्र दिला. मंदार ला ढोलकी दिल्याबद्दल आणि संस्थेला सतरंज्या दिल्याबद्दल संस्थेतर्फे आभार व्यक्त केले. मंदार ला सुट्टीत पुढील तबला वादक ही तयार कर असे सुचवले. शाळा सोडून गेल्यानंतरही सर्व विद्यार्थ्यांनी फेसबुक, वेबसाईट च्या माध्यमातून शाळेशी कायम जोडलेले रहा, असे आवाहन केले.
संस्थेतर्फे सर्वांसाठी पावभाजी, जिलबी,नारळ वडी, कचोरी व केळी/द्राक्ष अश्या अल्पोपहाराची व्यवस्था केली होती
शेवटी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यानी मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
०९ फेब्रुवारी - आदर्श विद्यार्थिनी
दिनांक ०९ फेब्रुवारी २०१९
तन्वी प्रवीण माईणकर – आदर्श विद्यार्थिनी
तन्वी चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सन्मित्र मंडळ,गोरेगाव मध्ये झाले. २००६ साली झालेल्या शालांत परीक्षेत तन्वी मुंबई बोर्डात ३री आली होती (त्याच वर्षी सन्मित्रच्या अपूर्वा अनिल कामत व अदिति अनिल वालझाडे ह्या मुंबई बोर्डात अनुक्रमे १३ व १४ क्रमांकावर होत्या). तन्वी ने बारावी पर्यंतचे शिक्षण रूपारेल कॉलेज मध्ये व पुढे संगणक अभियांत्रिकी शिक्षण फ्रांसिस कोन्शियो रॉड्रिग्ज महाविद्यालयात घेतले. २०१२ ते २०१४ मध्ये तिने “SME- Subject Matter Expert” म्हणून Amdocs,पुणे येथे नोकरी केली. २०१४ ते २०१६ ह्या कालावधीत तीने अमेरिकेतील “Carolina State University” मधून MS in Computer Science केले. सध्या ती उबर ह्या अमेरिकेतील San Francisco) येथे Reliability engineer म्हणून कार्यरत आहे.
सन्मित्र मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला तिला उपस्थित रहाता आले नाही तरी तिला शाळेसाठी काही तरी द्यायचे आहे अशी ईच्छा तिच्या वडिलांनी ( श्री. प्रवीण माईणकर – जे सन्मित्र मंडळ चे १९७१ SSC चे माजी विद्यार्थी ) मंडळाचे सदस्य अॅडव्होकेट श्री. नारायण सामंत ह्यांच्याशी बोलून दाखवली. कर्म धर्म संयोगाने , काळाप्रमाणे शाळेच्या बदलत्या गरजा, लक्षात घेऊन शाळेमध्ये “ Sanitary Pads Incinerator” व “Automatic Sanitary Pad Vending Machine ” बसवण्यासाठी मंडळाचा, शाळेचे माजी विद्यार्थी श्री. राहुल काळे ह्यांच्याबरोबर विचारविमर्ष चालू होता. तन्वी व प्रवीणजी दोघांनाही हा आधुनिक विचार शाळेत येणार्या विद्यार्थिंनींच्या दृष्टीने उपयुक्त वाटला आणि त्यांनी लगेचच ह्या दोन्ही मशीन्स साठी प्रायोजकत्व देण्याचे कळवले.
मंडळाने लगेचच “ Chariton ” ह्या कंपांनीच्या श्री. व्हीलोट कार्डोंज ह्यांना संपर्क केला आणि ८ फेब्रुवारी ला त्यांनी ही दोन्ही मशीन ( एकूण रक्कम रु. ४८,७५० ) शाळेत ईनस्टॉल केली. तन्वी आज अमेरिकेत परत जात असली तरी तिने वेळात वेळ काढून शाळेला भेट देण्याचे नक्की केले आणि त्यामुळे तिच्या हस्ते आज ह्या दोन्ही मशीन्सच्या अनावरणाचा एक छोटेखानी कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला तिचे आई, बाबा व भाऊ, मंडळाचे पदाधिकारी (श्री. विजय जोशी , श्री. अजित वर्तक) व कार्यकारिणी सदस्य (अॅडव्होकेट श्री. नारायण सामंत), तन्वी चे प्राथमिक आणि माध्यमिक चे शिक्षक , मुख्याध्यापक व विद्यार्थिनी उपस्थिती होत्या. मंडळाने ह्या अनमोल भेटीबद्दल तन्वीला विशेष आभार पत्र व पुढील वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. आज तन्वी सेलेब्रिटी झाली होती.विद्यार्थिनी आणि तिच्या शिक्षिकाही तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी उत्छुक होत्या.
शाळेचे काम विद्यार्थी घडवणे हे आहे, पण काही विद्यार्थ्यांमुळे शाळेची मान उंचावते अश्यापैकी एक तन्वी. तन्वी शाळेत असताना आदर्श विद्यार्थिनी होतीच, पण शाळा सोडून एक तप उलटल्या नंतरही आणि परदेशात असूनही तिने शाळेची आठवण ठेवली व शाळेतिल मुलींसाठी उपयुक्त भेट देवून माजी विद्यार्थ्यांपूढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.