top of page
डिसेंबर २०१८

संपन्न झालेले कार्यक्रम

१६ डिसेंबर - स्नेह संमेलन

सन्मित्र मंडळ, गोरेगाव २०१७-१८ हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. २०१७-१८ ह्या शालेय वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षभरासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ह्या कार्यक्रमाच्या मालिकांतील क्षिरपेच म्हणून १६ डिसेंबर २०१८ रोजी एक भव्य स्नेहसंमेलन आयोजित केले होते. १११० विद्यार्थी , त्यांचे पालक , आजी-माजी शिक्षक , मंडळाचे सभासद , गोरेगावतील इतर संस्थांचे सस्थाचलक, मुख्याध्यापक, ईतर मान्यवर व लोकप्रतिनिधी असे जवळपास २४०० गोरेगावकर उपस्थित होते. गोरेगावतील, संभाजी मैदान मिळवण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व स्थानिक नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचा मंच, ध्वनि , प्रकाश  व अन्य मैदानवरील आवश्यक व्यवस्था माजी विद्यार्थी प्रसाद वालावलकर ह्यांच्या साई डेकोरेटर्स ह्यांनी सांभाळल्या. कार्यक्रमाचे पूर्ण चित्रीकरण व LED स्क्रीन वरील प्रक्षेपण सस्थेचे हितचिंतक महेश निवाते ह्यांनी केले. प्रवेशद्वाराशी मंडळाच्या कर्मचार्‍यांनी काढलेल्या सुंदर रांगोळ्या सजल्या होत्या आणि निमिंत्रितांचे स्वागत करण्यास शिक्षक व पालक गुलाबजल / अत्तर व पुष्प घेवून सज्ज होते.

कार्यक्रमाचे निवेदन शाळेच्या माजी विद्यार्थी सौ. माधुरी देवधर(आकाशवाणी मुंबई एफ एम वाहिनीसाठी मुक्तछंद लेखन, निवेदन व दिगदर्शन करतात) व शाळेच्या आजी विद्यार्थ्यानी मिळून केले. कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी ५.३० वाजता मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व प्रमुख अतिथि श्री. आशीष माने (सुप्रसिद्ध व नामवंत गिर्यारोहक) ह्यांनी दीप प्रज्वलन व सरस्वतीपूजन करून केली. सोबत  प्रार्थना झाली. त्या नंतर प्रमुख अतिथिंचे स्वागत व सत्कार झाला,  सोबत विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. पुढील पाच तास विद्यार्थ्यानी विविध संस्कृतिक कार्यक्रमचे सादरीकरण केले. नूतन शिचू च्या वयवर्ष ३ पासूनच्या मुलांनी ते १० च्या विद्यार्थ्यांपर्यंत एकूण ५५० विद्यार्थी , सर्व शिक्षक , मंडळाचे कर्मचारी व निवडक पालक ह्यांनी सहभाग घेत गायन, नृत्य, तबला जुगलबंदी , सामूहिक गायन, छोटे स्किट व त्याला जोडून संगीत नृत्य असे एकूण ३१ भरगच्च कार्यक्रमंची मेजवानी दिली.. प्रमुख पाहुणे श्री. आशीष माने ह्यांनी त्यांच्या यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेबद्दल प्रेसेंटेशन देवून मुलामध्ये एक नवचैतन्य निर्माण केले. संथेचे अध्यक्ष व सन्मित्र मंडळ विद्या मंदिर चे माजी शिक्षक श्री. विजय जोशी ह्यांनी संस्थेच्या ईतिहासाची आठवण करून देत  पुढील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले व, सस्थेचे  संकेतस्थळ www.sanmitramandal.org लॉंच केले. शाळेचे माजी विद्यार्थी राहुल व स्वप्नील काळे (दत्त स्नॅक्स) ह्यांच्या सहयोगाने सर्व उपस्थितांना चटपटीत अल्पोपहार मिळू शकला. ठाणे जनता सहकारी बँक , जनकल्याण बँक , सारस्वत बँक व नॉव्हेलटी स्टोर्स ह्यांनी ह्या ह्या कार्यक्रमासाठी थोडे आर्थिक पाठबळ दिले.

संखेच्या मर्यादेमुळे काही पालकांना व गोरेगावतील हितचिंतकाना प्रत्यक्ष कार्यक्रमाला बोलावणे शक्य नसल्यामुळे , माजी शिक्षकांना प्रकृती अस्वास्थ्यमुळे किवा परदेशात असल्यामुळे हा कार्यक्रम खूप इच्छा असूनही बघता येणार नव्हता, हे लक्षात घेवून हा कार्यक्रम यूट्यूब वरील चॅनेल वर LIVE प्रक्षेपित केला गेला (https://www.youtube.com/watch?v=kiyeR7yqRhA) व त्याची जबाबदारी तुषार कांबळी ह्या माजी विद्यार्थ्याने लीलया पेलली. जगभरातील माजी शिक्षक व विद्यार्थ्यानी ह्या कार्यक्रमाचा नुसताच आस्वाद घेतला असे नाही तर तत्परतेने उत्स्फूर्त प्रतिसाद ही दिला (२४ तासच्या आत ह्या चित्रफितीला ९०० सप्स्क्रिप्शन आणि ७५९० च्या वर व्हीव्ज मिळाले). संस्थेचे संयुक्त कार्यवाह प्रशांत आठले, ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लागलेल्या सर्वांचे आभार मानले. आभार प्रदर्शन चालू असताना माजी विद्यार्थी प्रथमेश कोंडेकरने  (मान्यवरांना दिलेल्या स्मृतिचिन्हाच्या )छायाचित्राची तयार केलेली चित्रफीत LED स्क्रीन वर बॅकग्राऊंड ला दाखवण्यात आली .  संघाचे जयप्रकाश नगराचे कार्यवाह दीपक मयेकर ह्यांच्या सुरेल आवाजातील संपूर्ण वंदेमातरम ने कार्यक्रमाची  सांगता झाली.

ह्या कार्यक्रमाची मुख्य धुरा जर नारायण सामंत , नरेंद्र पुराणिक ह्या शाळेच्या माजी विद्यार्थी व  संस्थेचे खजिनदार अजित वर्तक ह्यांनी सांभाळली असली तरी संस्थेचे  सर्व कार्यकारिणी सदस्य, तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक सौ. नंदिनी भावे,  सौ. वैशाली सावंत व श्री. सिध्दार्थ गव्हाळे, पर्यवेक्षक सौ. रेखा मोरे, त्याचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी गेले महिनाभर केलेले परिश्रम व पालकांच्या सक्रिय सहभाग व सहकार्यामुळेच  हा भव्य कार्यक्रम यशस्वी व संस्मरणीय ठरु शकला.

 2 डिसेंबर  २०१८   

दिनांक २ डिसेंबर रोजी हीरक महोत्सवानिमित्त देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा विद्यार्थी आणि शिक्षक गटासाठी आयोजित करण्यात आली .त्यात  मालाड व गोरेगाव विभागातील नऊ शाळांनी भाग घेतला .

 

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दोन संगीततज्ञाना बोलाविण्यात आले होते .श्री .प्रणव मोडक व श्री.बेलोसे यांनी उत्तम परिक्षकांची भूमिका बजावली .स्पर्धेच्या बक्षीस समारंभा वेळी श्री.प्रणव मोडक यांनी गीत रामायणातील गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले .

 

सदर स्पर्धेतही आपल्या शाळेच्या विद्यार्थी गटास द्वितीय आणि शिक्षक गटास द्वितीय असे यश प्राप्त झाले .

bottom of page