


नोंदणी क्र. E-1817(Bom.)
संपन्न झालेले कार्यक्रम
२८ मे २०२१ स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त, त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना, सन्मित्र शाळेतील, शिक्षक आणि कर्मचारी
🙏 नमस्कार 🙏
🙏 आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती. त्यानिमित्त शाळेत त्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्याची काही छायाचित्रे.
२७ मे २०२१ कोरोना महामारी मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबास धान्यादी वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
🙏 नमस्कार 🙏
कोरोना महामारी मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या शाळेच्या प्राथमिक विभागातील
एकूण 33 गरजू पालकांच्या कुटुंबास आज दिनांक 27/05/2021 रोजी धान्यादी वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सावंत यांच्या ओळखीचे दयालस फाउंडेशनचे श्रीयुत पारसजी यांच्या संपर्कातून ही मदत आपल्या शाळेतील पालकांना मिळू शकली. श्रीयुत मनोज सोनावणे व श्रीयुत हर्ष चावडा या दोन दात्यांकडून आजच्या सर्व धान्यादी वस्तू आपल्या पालकांना उपलब्ध होऊ शकल्या. श्रीयुत पारसजी, श्रीयुत मनोजजी व श्रीयुत हर्षजी या सर्वांचे आपली संस्था, आपली प्राथमिक विभागाची शाळा व पालकांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले व त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सावंत या सदर कार्यक्रमास उपस्थित न राहू शकल्याने पूर्वप्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती नंदिनी भावे, प्राथमिकचे शिपाईकाका श्रीयुत अशोक सूर्यवंशी व शिपाई मावशी श्रीमती कविता ठोंबरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. 🙏