top of page

संपन्न झालेले कार्यक्रम

जुलै 2018

​१० जुलै - शिक्षकांची कार्यशाळा

आज दिनांक 10 जुलैला शिक्षकांसाठीची दुसरी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळा शाळेतील शिशुवर्ग ते दहावी अशा सर्व शिक्षकांसाठी होती.कार्यशाळा श्री. दिलिपराव बेतकेकर, निवास गोवा, M.A.- इंग्रजी, म.A -अर्थशास्त्र, M.A- इतिहास, M.A.- राज्यशास्त्र व उपाध्यक्ष, विद्याभारती, अखिल भारतीय शिक्षण संस्थान, यांनी घेतली.


कार्यशाळेचे उद्घाटन सौ. अश्विनीताई साखळकर (M.A. in Education, B.Ed., Masters in Guidance & Counselling) यांनी केले. आपण समजतो त्यापेक्षा आपली क्षमता कितीतरी जास्त असते आणि ती गाठण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. स्वतःच्या हीरक महोत्सवी वर्षात संस्था, शिक्षक प्रबोधनाचे असे कार्यक्रम करीत असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. 

शिक्षकांचे स्वतःचे राहाणे कसे आनंदी असावे, त्यांचा आपल्या सहकारी शिक्षकांबरोबरचा संवाद कसा मैत्रीपूर्ण असावा, वर्गात जाण्यापूर्वी शिक्षकाने काय-काय आणि नेमकी कशी तयारी करावी, त्यासाठी कोणती पुस्तके आज उपलब्ध आहेत, प्रत्यक्ष शिकवताना कसे शिकवावे, आपली स्वतःची

 शैक्षणिक कौशल्ये कशी विकसित करावीत , शिक्षकाने स्वतःचे मन स्थिर आणि शांत कसे करावे या आणि अशा एक ना अनेक गोष्टीं बद्दल मा र्गदर्शन करीत कार्यशाळा पुढे - पुढे जात होती. हे सर्व मार्गदर्शन श्री. दिलिपराव बेतकेकर ह्यांनी आपल्या भाषणातून नाही तर शिक्षकां बरोबर घेतलेल्या कृतिसत्रांतून केले.


आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा ठराविक अवधी नंतर परत-परत व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यशाळेला तीनही विभागांचे (पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक) मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, संस्थेचे  अध्यक्ष श्री. जोशीसर, संयुक्त कार्यवाह श्री. प्रशांत आठले आणि खजिनदार श्री. अजित वर्तक उपस्थित होते. 

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page