


नोंदणी क्र. E-1817(Bom.)
संपन्न झालेले कार्यक्रम
२१ जून - योग कार्यशाळा
आज जागतिक योगदिनाचे औचित्य साधून आणि हीरक महोत्सवी वर्षानिमित्त घेतलेली योग कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळा दुपारी ३:१५ ते संध्याकाळी ५:३५ पर्यंत चालली.कार्यशाळेत आपल्या शाळेतील २४ शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. योग विद्या निकेतनचे ८ प्रशिक्षक व अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे आले होते. त्यात 2 माजी विद्यार्थी आणि एक माजी पालक होते. सुरवातीला ०३:१५ वाजता कार्यशाळा सुरु होताना श्री. प्रशांत आठले यांनी छोटेसे प्रास्ताविक केले आणि श्री. निलेश ताटकरांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. बडवे आणि त्यांचे दुसरे ट्रस्टी श्री. परब सर यांचे स्वागत केले.
योगाची माहिती सांगणे, योगाचे प्रात्यक्षिक दाखवणे, त्याचे फायदे (शिक्षिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी) विशद करणे, त्यातील बारकावे सांगणे आणि शक्य असेल तिथे ते - ते आसन प्रत्यक्ष करुन घेणे असे प्रत्येक आसनाबाबत घडत होते. अशी ही कार्यशाळा सव्वा तीन तास रंगली.
समारोपाला श्री. प्रकाश नानिवडेकर, श्री. जयंत विद्वांस आणि श्री. प्रशांत आठले उपस्थित होते.