top of page
नोंदणी क्र. E-1817(Bom.)
७ सप्टेंबर २०१८ अर्थ नियोजन मार्गदर्शन
हीरक महोत्सवी वर्षात मंडळाने आपल्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात उपयोगी होईल असा एक उपक्रम करायचा ठरवला आहे, तो म्हणजे - 'अर्थ नियोजन मार्गदर्शन'
त्यानुसार, आज दुपारी 11.45 ते 01.45 असे सुमारे दोन तास मंडळाचे उपाध्यक्ष आणि अर्थ-नियोजन ह्या विषयातले तज्ज्ञ श्री. जयंत विद्वांस यांनी प्राथमिकच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना त्या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी स्वतःच्या मिळकतीची गुंतवणूक कशी करावी, ज्यायोगे त्यापासून स्वतःला जास्तीत जास्त फायदा होईल हे समजावून सांगितले. त्यासाठी त्यांनी दृक्-श्राव्य माध्यमाचा उपयोग केला. सर्व मिळून 14 जण उपस्थित होते.
bottom of page